“आता फक्त कमळच ” बुलडाण्यात महायुतीचे बॅनर झळकले पण आमदार संजय गायकवाड यांचा फोटो वगळला

20

(मोताळा लाईव्ह ) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा महायुतीमध्ये अजून निर्णय झालेला नाही. याआधी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि शपथविधी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. शपथविधीपूर्वी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर बुलढाण्यातील संगम चौकात लावण्यात आले आहेत. “राज तिलक की करो तयारी आ रही है भगवाधारी” असा या बॅनरवर आशय आहे.