( मोताळा लाईव्ह ) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुकीत एक हाती सत्ता मिळाल्यानंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबई येथील आझाद मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.. या शपथविधीचा सोहळा शहरातील नागरिकांनी पहावा यासाठी स्क्रीन देखील लावण्यात आल्या होत्या.. तर शपथविधीनंतर ढोल ताशाच्या गजरात भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत देवेंद्र फडणवीस यांचे कट आउट हातात घेत फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे..