वाहन धारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घेण्याचे आवाहन

23

(मोताळा लाईव्ह )सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने दिनांक 1 एप्रिल 2019 पासून नवीन उत्पादीत होणाऱ्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 1 एप्रिल 2019 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक असून वाहन वितरकांद्वारे ही नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे. तरी सर्व वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

वाहनाचे नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा करीता झोन 3 मध्ये M/s FTA HSRP Solution Ptv Ltd. ही एजन्सी असून HSRP बुकींग पोर्टल लिंक http://maharashtrahsrp.com हा आहे. या करिता नेमण्यात आलेल्या पुरवठाराची यादी उप प्रादेशिक परिवहन कर्यालयाच्या सुचनाफलकांवर लावण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, दि. 1 एप्रिल 2019 पुर्वी नोंदणी झालेल्या वाहनांनी HSRP बसविण्याची कार्यवाही त्वरीत करावी. याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा वरील लिंकवर देण्यात आली असून अर्जाचे शुल्क भरणा ऑनलाईन करावा, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.