रविकांतभाऊ तुपकर यांचा बुलढाणा व मोताळा तालुका भेटी-गाठी दौरा…

28

{मोताळा लाईव्ह } बुलढाणा तालुक्यात मा. रविकांतभाऊ तुपकर यांनी काल (दि.09 जाने 2024) विविध ठिकाणी भेटी दिल्या, त्यामध्ये त्यांनी देवपूर येथे श्री.किसन वारे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट देवून शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यानंतर डोमरुळ येथे सरपंच श्री.विशाल धंदर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली. तसेच भडगाव येथे स्व.भास्करराव साखरे यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले व श्री.शिवाजी तायडे यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट देवून शोकसंवेदना व्यक्त केल्या. तर सातगाव म्हसला येथे श्री.उमेशसिंग जाधव यांच्या वडीलांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली व रुईखेड मायंबा येथे श्री.तेजराव उगले यांचा मुलगा स्व.प्रदीप उगले यांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले.त्याचबरोबर रविकांतभाऊ तुपकर यांनी मोताळा तालुक्यातही विविध ठिकाणी भेटी दिल्या, त्यामध्ये त्यांनी अंत्री येथे श्री.शेखर सुरडकर यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली. तर श्री.भागवत साबे यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देवून शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यानंतर डिडोळा येथे श्री.भगवान इंगळे यांचा मुलगा स्व.गणेश इंगळे यांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली व स्व.विनायक सोनार यांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट देवून कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच श्री.भास्करराव पठाडे यांच्या बहीणीचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट दिली. त्यानंतर मूर्ती येथे बाबूराव सोनुने यांचे आजोबा स्व.लक्ष्मण सोनुने यांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट देवून शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्याचबरोबर नळकुंड येथे भाऊंचे सहकारी श्री.शुभम साबळे यांची CISF मध्ये निवड झाल्याने त्यांच्या निवासस्थानी रविकांतभाऊंनी भेट देवून त्यांचा सत्कार केला……