जिजाऊंच्या गर्भसंस्कारातून छत्रपती घडले. छत्रपती निर्माण करण्यासाठी प्रथम जिजाऊ व्हावे लागते.. शाहीर सिंधुताई अहेर.

21

 (मोताळा लाईव्ह ):राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारातून स्वराज्याला छत्रपती मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या गर्भाशयात असतानाच शौर्यगाथा आणि लढण्याचे प्रशिक्षण छत्रपतींना मिळाले होते. त्यामुळे छत्रपतीं शिवरायांनी आदर्श स्वराज्य प्रणालीची निर्मिती केली. तीच संस्काराची प्रक्रिया जिजाऊंच्या लेकींनी अंगीकारावी तीच खरी जिजाऊंना मानवंदना ठरेल.असे परखड मत साहित्यिक शाहीर सिंधुताई अहेर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मातृतिर्थ रणरागिनी संघटना, झाशी राणी ब्रिगेड, आझाद हिंद महिला संघटना, बहुजन महिला संघटना, रमाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने 12 जानेवारीला बुलढाणा येथे एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम सत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शाहीर सिंधुताई अहेर यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना जिजाऊ वंदना आणि सामूहिक पुष्प समर्पित करून वंदन करण्यात आले.छत्रपती शिवराय जन्माला यावे परंतु शेजारच्या घरात हा संस्कृती आणि संस्काराचा ऱ्हास आहे.यामुळेच सद्यस्थितीत संस्कारहीन पिढी निर्माण होत आहे. महिलांनी स्वयंकेंद्रितपणा बाजूला सारून राष्ट्रमाता जिजाऊ सारखे संस्कार आणि संस्कृती स्व: परिवारापासून जोपासणे काळाची गरज आहे. प्रामुख्याने मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील आपण असल्यामुळे आपली जबाबदारी मोठी आहे.असा एकंदरीत सूर चर्चासत्रातून समोर आला. चर्चासत्रात हभप कृष्णा महाराज झांबरे, अँड सतीशचंद्र रोठे पाटील, पंचफुलाबाई गवई,शाहीर बेबीताई जाधव, कमल वानेरे, यमुना तायडे, सविता खंडागळे, रेणुकाबाई दाभाडे, गीता जाधव, यमुनाबाई अवचार, रेणुका जाधव, कावेरी जाधव, कल्पना वानेरे, श्रद्धा अहिरे,
सुरूबाई जाधव, सत्यभामा फुलझाडे, उषा येवतकर, कावेरी जाधव, अनिता तायडे, पूर्णाबाई जिने, पूर्णा चाफेकर, निर्मलाताई रोठे,गीता दिवाने आदींनी सहभाग घेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.चर्चासत्राला आयोजक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्यासह जिल्ह्यातील वारकरी, साहित्यिक, कलावंत, शाहीर, भजनी मंडळ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.