केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव उद्या मोताळा तालुक्यात

18

(मोताळा लाईव्ह ) केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे रविवारी, दि. १९ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.त्यांच्या दौऱ्यानुसार, सकाळी ९.३० ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत चिखली व मलकापूर येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती, दुपारी १ वाजता मलकापूर येथून दाताळामार्गे शेलगांव बाजार ता. मोताळाकडे प्रस्थान व आमदार संजय गायकवाड यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती, दुपारी १.२० ते ४ वाजेदरम्यान मोताळा तालुक्यातील शेलगांव बाजार, सावरगांव, निपाणा, आव्हा, उऱ्हा, लिहा बु. पिंपळगाव देवी येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती, दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान पिंपळगांव देवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय श्री छत्रपती संभाजीनगर येथील ईडबल्यूएस अंतर्गत मंजूर इमारतीचे ॲानलाईन पद्धतीने उद्घाटन, सायंकाळी ५.१० ते ६.४५ वाजेपर्यंत मोताळा तालुक्यातील सिंदखेड ल, धामणगाव बडे, सारोळा मारोती आणि वडगांव खं येथे आयोजित स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती, त्यानंतर सोईनुसार मेहकरकडे प्रस्थान करतील.