जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील उद्या बुलडाण्यात

25

{मोताळा लाईव्ह } राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील हे गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार गुरुवार दि. 30 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथून सकाळी 11.10 वाजता हॅलिकॉप्टरने बुलढाणा येथे आगमन. सकाळी 11.25 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणाकडे रवाना व दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीकरिता उपस्थिती. दुपारी 3 वाजता बुलढाणा येथून हॅलिकॉप्टरने साताराकडे रवाना होतील