पोलीस गृहसंकुलासाठी प्रयत्नशील
विधानसभा आचारसंहितेमुळे थांबलेल्या पोलीस गृहसंकुलाच्या प्रस्तावांना मान्यता मिळण्यासाठी प्रयत्नरत आहे. सर्व प्रस्ताव पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. पोलीस गृहसंकुलाचे सर्व प्रस्तावांना तात्काळ मंजूरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व आणि आत्ताच्या पोलीसांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल झाले आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे पोलीस प्रशासनात वेगवेगळ्या शाखा स्थापन झाल्या आहेत. जुन्या पोलीस स्टेशनची जागा अपुरी पडत होती. परिणामी लोकांना उभे राहावे लागत होते. त्यामुळे लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या नवीन इमारतीमध्ये विविध शाखा, सीसीटिएनएस अंतर्गत ॲानलाईन एफआयआर सुविधा, ॲम्बीश प्रणाली, सीसीटिव्ही यंत्रणा शासनाच्यावतीने सुरु करण्यात येईल. जिल्ह्यातील ३३ पैकी आठ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारती झाल्यात आहेत. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सात कलमी कृती आराखड्यांतर्गत आज दोन इमारतींचे भूमिपूजन झाले असून तीन इमारतीचे कार्यादेश झाले आहेत. येत्या काळात हे पोलीस स्टेशन नव्या रुपात जनतेच्या सेवेत येत असल्याचे मनोगत विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले.जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामासाठी ना.ॲड आकाश फुंडकर यांनी २० कोटींचा निधी आणला आहे. त्यांच्या प्रयत्नाने पिंपळगाव राजा, जलंब, मेहकर आणि जळगांव जामोद येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधकाम मंजूर झालेले आहे. जलंब पोलीस स्टेशनची इमारत ही १९१७ सालच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील असून ती जीर्ण झाली असल्याची दखल घेत ना. फुंडकर यांनी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला आहे. जलंब पोलीस स्टेशनचा परिसर एकूण १३,४०० चौ.मीटरचा आहे. या नवीन इमारतीमध्ये ४५० चौ.मी क्षेत्रात तळ मजला आणि तेवढ्याच क्षेत्रात पहिला मजला असे इमारतीचे बांधकाम होणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे यांनी प्रास्ताविकात दिली.