केंद्रीय अर्थसंकल्प -२०२५ जाहीर जनसंवाद कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हा..

18

[मोताळा लाईव्ह] पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात नुकताच केंद्रीय अर्थमंत्री ना.निर्मलाजी सितारामन यांनी विकसित व आत्मनिर्भर भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प अधिक व सविस्तरपणे समजून घेता यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी भाजपाच्या वतीने राजे गार्डन बुलढाणा येथे दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जाहीर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या जनसंवाद कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यसभा सदस्य, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा.डॉ. भागवतजी कराड हे मार्गदर्शन करणार आहे नागरिकांशी संवाद साधणार आहे. याशिवाय या जनसंवाद कार्यक्रमासाठी राज्याचे कामगार मंत्री ना.आकाशजी फुंडकर, भाजपा विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुखजी संचेती, प्रदेश महामंत्री आ.रणधीरजी सावरकर , माजी मंत्री आ. डॉ संजयजी कुटे, आ.श्वेताताई महाले पाटील, आ.वसंतजी खंडेलवाल ई मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

तरी केंद्रीय अर्थसंकल्प- २०२५ या विषयावर आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या जाहीर जनसंवाद कार्यक्रमास जिल्हातील नागरिकांनी तसेच भाजपा पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख तसेच भाजपा लोकसभा प्रमुख मा.आमदार विजयराज शिंदे यांनी केले आहे.