[मोताळा लाईव्ह ] विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटने कडून उपविभागीय कार्यालय मोताळा या ठिकाणी आंदोलनात्मक निवेदन उपविभागीय अधिकारी यांद्वारे राज्याचे मुख्यमंत्री यांना करण्यात देण्यात आले .
उझबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात आहे. वास्तविक, औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मरण पावला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज याच्यावर केलेले क्रूत्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या याने केली. श्री. काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले, मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा यानेच विध्वंस केला. सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर, 3/60 जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो हिंदूच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूची भयानक क्रूर कत्तल केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मातरण केले. अश्या क्रूरकर्मा आतंकी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर हि पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच, अनंत यातनांचे प्रतिक आहे. म्हणून औरंगजेब याची कबर पूर्णपणे नष्ट करावी. परकीयांचे कुठलेही नामोनिशाण हे नष्ट झाले पाहिजे. योग्य कबर पुर्णपणे काढून टाकावी. व हे न झाल्यास पूर्व सुचित करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजा बरोबर संभाजी नगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर ध्वस्त करतील असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून समस्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला या वेळी मोताळा शहरातील हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ता व असंख्य बजरंग दल कार्यकर्ता उपस्थित होते