बुलडाणा पोलीस अधीक्षकांची गाडी अडविली.. काळे झेंडे दाखविले.. जाब विचारला.

35

[मोताळा लाईव्ह] जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करावे. गाहाळ झालेल्या मुलींचा शोध लावावा, उपोषणाची जागा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर द्यावी,उपोषण करताना रात्री संरक्षण मिळावे, शहरात महिलांसाठी प्रसाधनगृह स्वच्छतागृह विनामूल्य सुरू करावे यासह जिल्ह्यातील 11 ज्वलंत मागण्यांसाठी आझाद हिंद महिला संघटनेने 22 मार्चपासून जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशीही पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आझाद हिंद महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या .
त्यामुळे आज 26 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता जिजामाता प्रेक्षागार,आयडीबीआय बँकेसमोर उपोषण मंडपाला लागून असलेल्या चौकात जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना शेवटच्या दिवशी काळे झेंडे दाखवीत निरोप दिला.
सदर घटनेमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. आझाद हिंद महिला संघटनेच्या आमरण उपोषण आंदोलनाने अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवीत रस्त्यात अडविण्याचाआंदोलनात्मक पवित्रा घेतल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
मागण्यांकडे दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. तर यापुढील लक्ष जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या गाड्या थांबून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा आझाद हिंद च्या वतीने देण्यात आला आहे.