ॲड. मेघा पराग वाघ यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती

20

[ मोताळा लाईव्ह ] केंद्र सरकारच्या केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांच्यावतीने नोटरी अधिकारी म्हणून बुलढाणा तालुक्यातील ॲड. मेघा पराग वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. मेघा पराग वाघ ह्या अनेक वर्षापासुन परिसरात वकीली व्यवसाय करीत असून त्या सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. ॲड. मेघा ह्या बुलढाणा येथील अजिंठा रोडस्थित सुप्रसिद्ध असलेल्या आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विदर्भ वंजारी सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ यांच्या स्नुषा असून सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ग्राम चिखला येथील उच्चविद्यविभूषित कर्तव्यदक्ष सरपंच ॲड. परागदादा वाघ यांच्या सुविद्य अर्धांगिनी आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव जायभाये, सचिव पंजाबराव इलग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, संचालक मंडळ तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या आहे.