(मोताळा लाईव्ह)मोताळा शहरातील असलेल्या आठवडी बाजारातील श्री किराणा दुकान व जय दुर्गा इलेक्ट्रिकल या दोन्ही दुकानाला काल रात्रीच्या १२ बाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या दुकानांमध्ये असलेल्या किराणा मालाचा अक्षरश राख झाली असून याच किराणा दुकानाच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक दुकानातील वस्तूच्या सुद्धा संपूर्ण कोळसा झाल्या असून या आगी मध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी बुलढाणा नगरपरिषद येथील अग्निशामक दल व मलकापूर नगरपरिषद चे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते अथक परिश्रम करून या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली… मोताळा नगरपंचायत असताना सुद्धा मोताळा नगरपंचायत ला अग्निशामक यंत्रणा नाही त्यामुळे बुलढाण्यावरून या मलकापूर वरून अग्निशामक येण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात दुकानातील मालाची अक्षरशः राख रांगोळी झाली होती आग लागल्यानंतर 40 ते 50 मिनिटात या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा दाखल झाली मात्र तोपर्यंत आगीमुळे मोठे नुकसान झाले होते मोताळा नगरपंचायत असताना सुद्धा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अग्निशामक यंत्रणा याची मागणी होत असताना सुद्धा मात्र अद्याप या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा मिळाली नाही जर भविष्या जर भीषण आग लागली तर यापेक्षाही मोठे नुकसान होऊ शकते यात शंका नाही त्यामुळे मोताळा नगरपंचायतला अग्निशामक यंत्रना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिक करत आहे….