भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक करण्याकरिता बुलढाण्यात 20 मे ला तिरंगा मोटार सायकल रॅली तिरंगा रॅलीत हजारोच्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा: भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे

115

[मोताळा लाईव्ह] : भारताच्या जवानांनी अदम्य साहस दाखवून पाकिस्तानच्या छातीवर वार करत आपले शौर्य संपूर्ण जगाला दाखवून दिले. त्यांच्या या शौर्याचे कौतुक करण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 20 मे रोजी बुलढाणा शहरात सर्वपक्षीय मोटार सायकल तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. या तिरंगा रॅलीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजारोच्या संकेत उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराव शिंदे यांनी केले आहे.
पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करून निरपराध नागरिकांची हत्या केली. आपल्या या नागरिकांच्या हत्येचा जेबदला घेण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील जवानांना खुली छुट दिली होती. त्यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय सैन्याने पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला केला आणि शंभर पेक्षा जास्त आतंकवादी तर पन्नास पेक्षा जास्त पाकिस्तानच्या सैन्याना कबर मध्ये गाडुन त्यांना त्यांची औकात दाखवून दिली. भारतीय जवानांचे हे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले. म्हणून आपल्या जवानांचे कौतुक करण्याकरिता बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि. २० मे रोजी सकाळी दहा वाजता शिवालय येथुन तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आली आहे. या रॅलीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन आपल्या जवानांन प्रति कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराव शिंदे यांनी केले आहे.