भरगाव स्विफ्ट कारची टेम्पो ट्रॅव्हलर ला जोरदार धडक खामगाव येथील घटना

21

[ मोताळा लाईव्ह ] भरधाव स्विफ्ट कारची टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिल्याची घटना काल रात्री साडे अकराच्या सुमारास अकोला बायपास वर घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार शेगाव वरून छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर ही अकोला बायपास वर हॉटेल साई जवळून वळण घेत असताना मेहकर येथून मित्राचे लग्न आटपुन धुळे येथे जाणाऱ्या स्विफ्ट कारणे टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली यामध्ये स्विफ्ट कार मधील ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला युवक हा लागलेल्या धडकेत स्विफ्ट कारचा काच तोडून जोरदार आडळला व गंभीर जखमी झाला. तर स्विफ्ट कार मधील तीन युवक हे किरकोळ जखमी झाले. मात्र यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलर मधील कोणालाही दुखापत झालेली नाही. सदर धडक इतकी जोरदार होती की या धडकेमध्ये शिफ्ट कार व टेम्पो ट्रॅव्हलर चे मोठे नुकसान झाले आहे.