( मोताळा लाईव्ह) मोताळा नगरपंचायत च्या काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचा आज दिनांक 3 जून 2025 रोजी नागपूर येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला असून त्यामध्ये काँग्रेसचे असलेले विद्यमान नगरसेवक ..शेख शहनाज बी शेख सलीम .शेख तसलीम शेख सलीम. नगरसेवक पुत्र संदीप वानखेडे माजी नगरसेवक तथा नगरसेवक पती विजय सुरळकर नगरसेवक पती कैलास भाऊ खर्चे नगरसेवक पती आसिफ कुरेशी. इत्यादी नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला असून काही दिवसा अगोदरच विजयराज शिंदे यांनी स्पष्ट केले होते की बुलढाणा जिल्हा भाजपमय करणार त्याची सुरुवात त्यांनी केली असून मोताळा येथील असलेले काँग्रेसचे सहा नगरसेवकांसह नगरसेवक पती भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला असून त्यामध्ये आता मोताळा नगरपंचायत मध्ये भाजपची नगरसेवक संख्याही सध्या तरी शून्या वरून वाढ झाली असून त्यामुळे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी काही दिवसा अगोदर माध्यमांशी बोलताना सांगितले होते की बुलढाणा जिल्हा आम्ही भाजप नाही करणार याचीच पाळमुळे रवण्यास विजयराज शिंदे यांनी सुरुवात केली आहे …..
नगरसेवक यांचा भाजपमध्ये का केला प्रवेश ?
मोताळा नगरपंचायत मध्ये काँग्रेसचे सत्ता असून मोताळा नगरपंचायत मध्ये 17 सदस्या पैकी बारा सदस्य काँग्रेसची निवडून आले होते नगरपंचायत वर काँग्रेसचा झेंडा होता मात्र गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे नगरसेवक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत होती त्यामुळे हा पवित्रा काँग्रेसचे नगरसेवक हा पवित्रा यांनी घेतला आहे…..