Motala live : गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केल्याची घटना 10 जुलै रोजी 5.30 पूर्वी अनिल काशिनाथ पाटील यांचे शेतातील गोठ्यात उघडकीस आली यामध्ये फिर्यादी -वसंता हरीभाऊ नारखेडे, वय 42 वर्षे व्यवसाय – शेती रा. नांदुरा खुर्द यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की नमुद घ ता वेळी व ठिकाणी फिर्यादी हे त्याचे शेतातुन घरी येत असतांना त्याना संदीप फासे याचा फोन आला व त्यानी सांगीतले की, अनिल काशीनाथ पाटील यांचे शेतातील गोठयात तुमचा चुलत भाऊ नारायण तुकाराम नारखेडे याने गोठ्यातील लोखंडी एंगलला साडीच्या कपडयाने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.त्यामुळे फिर्यादीनी यानी घटनास्थळी जावुन पाहीले असता त्याना त्याचा चुलत भाऊ नारायण तुकाराम नारखेडे हे गोठयातील लोखंडी एंगलला साडीच्या कपड्याने गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याचे दिसले.त्याने आत्महत्या का केली याबाबत फिर्यादीला काही माहीती नाही व फिर्यादीचा कोणावरही संशय नाही.अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोहेकॉ भारसाकळे बन 2068 नी मर्ग सदरचा दाखल करुन मा. पोनिसा यांच्या आदेशाने प्राथमीक चौकशी डि ओ पोहेकॉ सैय्यद ब नं 642 यांचे कडे देण्यात आले. यावेळी सदर घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे एम एस सय्यद, ओमसाई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर,नितीन ठाकरे,विष्णू धांडे,कृष्णा वसोकार व इतर नागरिकाच्या मदतीने शेतामधून मृतदेह आणण्यात आला.