Motala live : दादर येथे दिवंगत माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिले व घोषणाबाजी करून आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
यावेळी शिवसेना प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी सांगितले की, “माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा व स्त्रीशक्तीचा अपमान आहे. अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.”
आंदोलनानंतर शिवसेना प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन दिले. या निवेदनात दोषींना तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यात पूर्णतः अपयशी ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्यातील कोलमडलेल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
महायुती सरकारचे द्वेषाचं राजकारण आणि कोलमडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे राज्यात माणसंच नाही तर पुतळे देखील असुरक्षित झाले आहेत. दादर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज बुलढाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच वंदनीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लखनभाऊ गाडेकर, बुलढाणा तालुकाप्रमुख विजयभाऊ इतवारे, जिल्हा समन्वयक डी एस लहाने सर, किसान सेना उपजिल्हाप्रमुख अशोकभाऊ गव्हाणे, विधानसभा सहसंपर्कप्रमुख अनिलभाऊ नरोटे, शहर प्रमुख नारायणभाऊ हेलगे, जिल्हासंघटक सुमितभाऊ सरदार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजयाताई खडसान, युवा सेना तालुकाप्रमिख संजयभाऊ शिंदे, उपशहरप्रमुख राहुलभाऊ जाधव, चिखली तालुका संघटक रुपालीताई चौधरी, उपतालुकाप्रमुख संजयभाऊ गवळी, प्रसिद्धीप्रमुख गजाननभाऊ बबनभाऊ खरे, मोहम्मद सोफियान, शेख रफिक, चिखली शहरप्रमुख लक्ष्मीताई बकतवर, युवासेना शहरप्रमुख अनिकेत गवळी, बुलढाणा शिवसेना महिला आघाडीच्या अनिताताई गायकवाड, निर्मलाताई खरात, गोदावरीताई काळे, रत्नाताई शेळके, शुभांगी बाहेकर, वर्षाताई खरात, रेवती बाहेकर यांच्यासह शिवसैनिक बंधू- भगिनी उपस्थित होते!