मनोरुग्ण महिलेला ओम साई फाऊंडेशनच्या मदतीने आत्मसन्मान फाउंडेशन मध्ये केले दाखल

15

Motala live : एक मनोरुग्ण महिला राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस विमनस्क अवस्थेत फिरत असल्याचे काही सुजाण नागरिकांना आढळून आल्याने त्यांनी सदर महिलेला उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले मात्र मनोरुग्ण महिलेला तीचे नाव,गाव याबाबत कोणतीही माहिती व्यवस्थित रित्या देता येत नसल्याने तसेच ती निराधार असल्याने तिचे अन्न पाणी, निवारा व पुढील उपचार करणे आवश्यक असल्याने बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांच्याशी संपर्क साधून या मनोरुग्ण महिलेबाबत माहिती देताच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या महिलेला फाउंडेशन मध्ये दाखल करण्यास होकार दर्शविला त्यानंतर ओम साई फाउंडेशन चे विलास निंबोळकर यांनी नांदुरा पोलीस ठाण्यातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रुग्णवाहिकेद्वारे सदर मनोरुग्ण महिलेला २० सप्टेंबरच्या रात्री उशिरा आत्मसन्मान फाउंडेशन मध्ये दाखल केले यावेळी नांदुरा पोलीस स्टेशनचे पोहेकॉ गजानन इंगळे, महिला पो कॉ सीमा गणगे, सुभाष वावगे,पोकॉ स्वप्नील खंडारे यांच्यासह बोदवड येथील संजय वराडे तसेच ओम साई फाउंडेशनचे प्रशांत जामोदे राजू खंडारे, आश्विन फेरण, बाळू सांबारे, संजय हुरपडे यांनी मदत कार्य केले