[ मोताळा लाईव्ह ] दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय निपाणा येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ खूप मोठ्या उत्साहात करण्यात आला, कार्यक्रमाचे उद्घाटन मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारसाकडे तसेच कार्यक्रमा करिता प्रामुख्याने उपस्थित असलेले गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नाही तहसीलदार महसूल, मोताळा पंचायत समितीचे शाखा अभियंता, व निपाणा येथील सरपंच सौ शारदा संतोष यांच्या हस्ते जल पूजन करून गावांमध्ये, जलदिंडी काढण्यात आली. जलदिंडीमध्ये गावातील सर्व महिला बचत गट, महिला वर्ग, भजनी मंडळ, शालेय विद्यार्थी, शेतकरी, माजी सैनिक, शहीद वीर माता, वीर पत्नी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरडकर साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निपाणी ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी केले, माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती मोताळा यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा तसेच योजनेची व्याख्या उपस्थित त्यांना समजावून सांगितली तसेच यामध्ये संपूर्ण गावाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. महाराजा स्व अभियानांतर्गत समाधान शिबिरा करता उपस्थित असलेल्या विविध विभागाच्या सर्व अधिकारी यांनी सदर योजनेमध्ये सर्व प्रकारचे सहकारी उपलब्ध करून देण्याबाबतची ग्वाही दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव देवी यांच्यामार्फत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते आरोग्य शिबिराचा लाभ बहुसंख्या नागरिकांनी घेतला. कार्यक्रमाकरिता महसूल विभाग, संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, आयुषमान भारत, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आधी विभागांचे प्रतिनिधी सेवा देण्याकरिता हजर होते. आरोग्यमित्र तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष तांदूळकर यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.