निपाणा गावात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम……

91

[मोताळा लाईव्ह ] असंसर्गजन्य आजाराची झपाट्याने वाढ होत असून जवळपास 63 मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 9% आहे
महाराष्ट्र राज्यामध्ये मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग हे सर्वात जास्त आढळणारे कर्करोग आहेत. त्याचप्रमाणे शुगर व bp हे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने त्याचे लवकर निदान व उपचार व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने ग्राम निपाणा येथे असंसर्गजन्य आजाराबाबत तपासणी करून आरोग्य शिक्षण देण्यात आले तसेच संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच शारदा संतोष तांदूळकर, ग्राम पंचायत अधिकारी,श्री आर एस सुरळकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव देवी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ लहाने साहेब व सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, सर्व उपस्थित राहून शिबिर यशस्वी करण्यास सहकार्य केले