Motala live : पंजाब आणि महाराष्ट्रात नुकत्याच आलेल्या विध्वंसक पुराने जनजीवन विस्कळीत होऊन त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर झाला आहे . या आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी या दोन्ही राज्यांतील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. त्यांनी पंजाबमधील व्यास नदीच्या आसपासच्या गावांमध्ये आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली . अपातग्रस्तांसोबत संवाद साधून त्यांनी त्यांच्या वेदना ऐकल्या घेतल्या आणि प्रशासनाला मदतीबाबत निर्देशित केले . सोबतच मोबाईल मेडिकल युनिट अभियानाचा शुभारंभ केला ..
पंजाब आणि महाराष्ट्र, ही देशाची कृषिप्रधान आणि प्रगतिशील राज्ये, या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. केंद्र सरकार आणि संपूर्ण देश या राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे . अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली देशाच्या विविध भागांमधून मदत साहित्य आणि आर्थिक सहाय्य पूरग्रस्त क्षेत्रांपर्यंत पोहोचत आहे, जे राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे.
या संकटाला तोंड देण्यासाठी पूरग्रस्तांच्या आरोग्य गरजांना सर्वोच्च प्राधान्य देत, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी “उत्तराखंड, हिमाचल, पंजाब आणि महाराष्ट्र पूरग्रस्तांसाठी मोबाइल मेडिकल युनिट (MMU) अभियान”चा शुभारंभ केला. हा अभियान सरकार आणि सामाजिक संस्थांमधील भागीदारीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यावेळी त्यांनी पर्नोड रिकार्ड इंडिया फाउंडेशनआणि TSL फाउंडेशनयांचे मनापासून आभार मानले, ज्यांनी या पवित्र कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या अभियानांतर्गत, सहा अत्याधुनिक आणि पूर्णपणे सुसज्ज मोबाइल मेडिकल युनिट्स सुरू करण्यात आली आहेत, जी पंजाब आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्त गावांपर्यंत थेट पोहोचतील. ही युनिट्स ‘जागरूकता, निदान, उपचार, रेफरल (ADCR)’मॉडेलवर कार्य करतील, ज्यामुळे तात्काळ वैद्यकीय सहाय्य, रोग प्रतिबंध आणि गंभीर प्रकरणांमध्ये योग्य रेफरल सुनिश्चित होईल.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . हे अभियान केवळ तात्काळ मदतीपुरता मर्यादित नाही, तर त्याचा उद्देश दीर्घकालीन आरोग्य सुरक्षितता प्रदान करणे असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला …