ए. एस. पी. एम. आयुर्वेद महाविद्यालयांत १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न

27

Motala live : संपूर्ण भारतभर मोठया उत्सहात साजरा होणाऱ्या १० व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त स्थानिक अजिंठा रोडस्थित ए. एस. पी. एम.आयुर्वेद महाविद्यालय बुलडाणाच्या वतीने विविध स्तुत्य उपक्रमांचे नियोजनबद्द आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमांतर्गत बुलडाणा शहरांतील धाड नाका चौक परिसरापासून अजिंठा रोडस्थित ए. एस. पि. एम. आयुर्वेद महाविद्यालय प्रांगणापर्यंत आयुर्वेद शास्र्याच्या प्रचार व प्रसाराकरिता ‘रन फॉर आयुर्वेद’ अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष मधुकरराव जायभाये, सचिव पंजाबराव इलग, कोषाध्यक्ष व प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, सहसचिव ऍड. पराग वाघ, मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, तालुकाध्यक्ष सतीश भाकरे पाटील, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, ऍड. मोहन पवार, अनंता शिंदे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी स्पर्धकांच्या उपस्थितीत यशस्वीतेरित्या संपन्न झाली. राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त दुपारच्या सत्रात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यांमध्ये आयुष आहार पद्धतीच्या अप्रतिम अश्या विविध पदार्थांचा समावेश असलेल्या भव्य प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहरातील निमाचे प्रदेश पदाधिकारी डॉ. अजय खर्चे व डॉ. प्रशांत ढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमांत देशातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय तटरक्षक दलात सहाय्यक कमांडंट व भारतीय लष्करात लेफ्टनंटपद प्राप्त करून मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे नांव अभिमानाने उंचावणारे अनिकेत पवार यांच्या दैदीप्यमान दुहेरी यशाबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धेतील प्रविण्यप्राप्त स्पर्धाकांना उपस्थित अतिथिंच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष मधुकरराव जायभाये, सचिव पंजाबराव इलग, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा संस्थेचे कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेश्वर उबरहंडे, संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती उबरहंडे, संचालक विजय जायभाये, कार्यक्रम समन्वयक सर्वस्वी डॉ. विवेक राजपूत, डॉ. प्रियांका चिंचोले व डॉ, दिपीका व्यवहारे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृन्द डॉ. प्रवीण पाटील, डॉ. स्वप्नील धोरण, डॉ. कांचन अंभोरे, डॉ. अरुण देशमुख, डॉ.संजय ठोकळ, डॉ.सुनिल नागरे डॉ.वैशाली पेड्डावाड, डॉ.राजीव बुधवत, डॉ.संदिपकुमार नागरे, डॉ. देवयानी खेळकर, डॉ.गणेश देशमुख, डॉ. भागवत वसे, डॉ.वर्षा सरसांडे, डॉ.दिपीका पाटील, डॉ. सुजित लहासे, डॉ.प्रविणकुमार कपले, डॉ.विष्णु सोनोने, डॉ.राहुल धनवई, डॉ.स्नेहल ईलग, डॉ. शैलेजा मोहरीर, डॉ.विशाल वसतकार डॉ.सोनाली वठारे, डॉ. प्रणाली काळे, डॉ. प्रियंका मोहाळे, डॉ. निकिता आढाव, शिक्षकेत्तर कर्मचारी, आंतरवासियता प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.