मोदीजींच्या सेवाभावी दृष्टिकोनातून प्रत्येक डोळ्यात उजळतोय आशेचा किरण– भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे

16

Motala live : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा पंधरवाडा’ म्हणून साजरा होत आहे. आज दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी मोताळा ग्रामीण रुग्णालय येथे ‘मोफत नमो नेत्र तपासणी,मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व भारतीय जनता पार्टी मोताळा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केले.

या शिबिरामध्ये प्रतिष्ठित तज्ञ नेत्ररोग तज्ञ,नर्स, आशा वर्कर्स ई नी सेवा दिली. शिबिरात जवळपास अडीच हजार गरजू नेत्र रुग्णांनी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये जवळपास 1700 रुग्णांना दर्जेदार चष्मे भारतीय जनता पक्षाच्या वतीने घरपोच मिळणार आहे. तर जवळपास 300 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. शिबिराला प्रचंड मोठी गर्दी जमल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गर्दीचे योग्य नियोजन करून आलेल्या रुग्णांना खिचडीचे वाटप, पाणी, बसण्यासाठी मंडप, अशी सर्व काही व्यवस्था नियोजन बद्ध केलेली होती.

यावेळी विजयराज शिंदे यांनी शिबिराचे उदघाटन करून उपस्थित हजारो रुग्णांशी संवाद साधला. “जनतेच्या डोळ्यांत प्रकाश फुलवणारा हा उपक्रम म्हणजेच पंतप्रधान मोदीजींच्या जनकल्याणकारी दृष्टीचा जिवंत अविष्कार आहे या शिबिरांमुळे हजारो रुग्णांच्या डोळ्यांत आशेचा नवा किरण उजळत आहे. पंतप्रधान मोदीजींच्या अनेक निर्णयांनी जनतेच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी दिशा दाखवली आहे. असे प्रतिपादन विजयराज शिंदे यांनी केले. प्रत्येक रुग्णाची तपासणी होई पर्यंत जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी शिबिरास हजेरी लावली.

शिबिरास अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम चुनावाले, मंडळ अध्यक्ष सचिन शेळके पाटील , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे, जिल्हा सचिव अशोक किंहोलकर,जेष्ठ नेते पुरुषोत्तम लाखोटीया, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे,जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल, अनु.जमाती जिल्हाध्यक्ष गजानन सोळंके, जिल्हा सचिव प्रवीण खर्चे, मोताळा नगरसेवक सर्व श्री.कैलास खर्चे, संदीप वानखेडे, तस्लिम आबा, आसिफ कुरेशी, बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर, मोताळा शहराध्यक्ष विजय सुरडकर, धामणगाव बढे मंडळ अध्यक्ष सागर पवार, मोहम्मद अकिल, महादेव शिराळ, कामगार प्रदेश सदस्य अण्णासाहेब पवार, माजी सरपंच उमेश वाघ, तालुका सरचिटणीस सर्व सागर पाटील, राजू सुरपाटने, नारायण देशमुख, श्रीकांत घाटे, विजय पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष दत्ता पाटील, दादाराव जुनारे, विश्वास वाघ, महिला मोर्चा सौ अंजली नारखेडे, पुरुषोत्तम दाते, नाना राजगुरे,संतोष वाडे, दत्ता नारखेडे, अमोल खर्चे,विश्वास पाटील, कैलास पाटील,माजी सरपंच गजानन पाटील,दीपक मिरगे,भाजयुमो मंडळ अध्यक्ष मंगेश क्षिरसागर, सुगम निंबाळकर , तुकाराम राठोड , कौलास माने, संदीप वानरे, ई असंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिबिराच्या यशस्वीते साठी मेहनत घेतली.

शिबिरास मोताळा ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक श्री डाबेराव, तालुका आरोग्य अधिकारी श्री चव्हाण, नोडल अधिकारी डॉ रवि शिंदे, डॉ अविनाश चिंचोले, सोबतच पोलीस प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी सहकार्य करून ई विशेष सेवा दिली या सर्वांचे भाजपा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.