राजपूत समाज दर्पण संकलन- रोज सकाळी उठून गरम पाणी पिल्याने शरीरास अनेक फायदे होतात. आजकाल बरेच जण वजन कमी करण्यासाठी गरम पाणी आणि निंबु सकाळी घेत असतात.मात्र विशेषज्ञ म्हणतात की फक्त साधे गरम पाणी जरी सकाळी पिले तरी त्याच्या भरपूर फायदा होतो. वजन कमी करण्याशिवाय गरम पाणी पिण्याचे इतरही फायदे आहेत.
सायनस मध्ये मिळतो आराम
सायनसमुळे नाक बंद राहिल्यामुळे दिवसभर डोकेदुखी चा त्रास होतो.अश्यात सकाळी 1 ग्लास गरम पाणी पिल्याने हा त्रास कमी होतो
दातांसाठी फायद्याचे
रोज सकाळी गरम पाणी पिल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात.
पचनक्रिया सुधारते
रोज सकाळी गरम पाणी पिल्याने अपचन, पित्त यांसारखे त्रास कमी होऊन पचनक्रिया सुधारते. गरम पाणी पिल्याने हा एक मोठा फायदा होतो.