मराठा समाज बांधवाचें सारोळा येथे आंदोलन

236

सारोळा ता,मुक्ताईनगर(विलास सिह पाटील) -येथे सकल मराठा समाज सारोळा व परिसर यांनी मराठा आरक्षण संदर्भात एक दिवसीय रस्ता रोको आंदोलन मुक्ताईनगर बोदवड रोड सारोळा बसस्टँड ला केले. यामध्ये गावातील व परिसरातील मराठा समाज बांधव ,राजपूत समाज बांधव व गावातील सर्वच जाती , व समाजाचे लोकांनी सहभाग नोंदवत सरकार चा व मराठा आरक्षण ला विरोध करणारे नेते यांचा निषेध केला. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गाव बंदी चे बॅनर गावात लावले असून मंत्री आमदार ,खासदार यांना गाव बंदी केली आहे ,
सदर रास्ता रोको आंदोलनात गावातील राजपूत समाज बांधव सुद्धा उपस्थित होते ,मराठा समाज युवक,महिला,लहान मुले सुद्धा या आंदोलनात सहभाग घेत सरकार चा जाहीर निषेध नोंदवत घोषणा दिल्या.