बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून चित बहुजन आघाडी कडून सतीश शिरेकर हे इच्छुक आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे पेशाने डॉक्टर असताना सुद्धा या मतदारसंघांमध्ये आरोग्य सुविधेवर लक्ष दिलेला नाही तसेच शेतकरी, युवकांचे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहे. या विधानसभा मतदारसंघाचा मागासलेपणा मला घालवायचाय आणि जनतेला न्याय द्यायचा आहे अशी प्रतिक्रिया सतीश शिरेकर यांनी व्यक्त केली आहे.
