शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी मिळणार !

29

(मोताळा लाईव्ह ): शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पात्र जलदगतीने पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निमिर्ती आणि शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी तयार करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना स्वत: किंवा शिबिरात आणि सीएससी केंद्रावर नोंदणी करता येणार असून या ॲग्रिस्टॅक योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांमार्फत शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचे आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येणार असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरण अर्थात ई-केवायसीची आवश्यकता राहणार नाही.

शेतकरी माहिती संचनिर्मितीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तीनही मोड म्हणजेच सेल्फ, कॅम्प आणि सीएससी मोडव्दारे उद्या दि.20 जानेवारीपासून बुलढाणा जिल्ह्यात करण्यात येणार आहे.

सर्व शेतकरी बांधवांनी गावनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सातबारा उतारा, ८अ व आधारकार्डसह उपस्थित राहून आपले ग्राम महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय व कॉमन सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून अॅग्रिस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडीसाठी https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या लिंकवर नोंदणी करावी किंवा क्यूआर कोडचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.