[मोताळा लाईव्ह ] राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीने सलग दुसऱ्यांदा बँको ब्लू रिबन पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.लोणावळा येथील ॲम्बी व्हॅली सिटीमध्ये ३० जानेवारी रोजी आयोजित समारंभात संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी माजी सहकार आयुक्त दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
अविज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ जानेवारी रोजी बँको पतसंस्था सहकार परिषद २०२५ व बँको पतसंस्था ब्लू रिबन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील बँकिंगमधील तज्ञांचे मार्गदर्शन यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी शाहू मल्टिस्टेटला बँको पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासह सामाजिक उपक्रम राबवण्यास राजर्षी शाहू मल्टिस्टेट कटिबद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल व उच्चशिक्षित मनुष्यबळ, प्रशस्त इमारत, कामाच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात संस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सहकारातील अनेक पुरस्कार संस्थेला मिळालेले आहेत. तर बँको ब्लू रिबन पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळाला. यामुळे संस्थेची मान गौरवाने उंचावली आहे. पुरस्कार सोहळ्याला बँको अविज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे-गुंडाळे, ग्लॅलेक्सी इनमा पुणेचे संचालक अशोक नाईक यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, दिग्गज, विविध संस्थांचे वरिष्ठ संचालक मंडळी आदी उपस्थित होते.