मोताळा तालुक्यातील जयपूर येथे जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडणारी टोळी गजाआड.

2278

[ मोताळा लाईव्ह ] मोताळा तालुक्यातील असलेल्या जयपूर गावामध्ये काल रात्री १० वाजेच्या सुमारास जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा बोराखेळी पोलिसांनी पर्दाफास केला असून त्यामध्ये ९ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे  मोताळा तालुक्यातील असलेल्या जयपूर गावातील राजेंद्र राठी यांच्या शेतातील फार्म हाऊस वरती काल दिनांक:२०/०३/२०२५ च्या रात्रीच्या 10 वाजेच्या सुमारास जादूटोणा करून पैसाचा पाऊस पडणारा असल्याची बोराखेळी पोलिसांनी माहिती मिळाली होती त्यावरून बोराखेळी पोलिसांनी सापळा रचून त्या शेतीतील फार्म हाऊस वर जादूटोणा पूजा करताना मिळून आले असून त्यामध्ये आरोपी गणेश समाधान मोरे वय वर्ष 32 रा उज्जैन मध्य प्रदेश राजेंद्र विठ्ठलदास राठी वय वर्ष ६० रा. जयपूर , नितीन विठ्ठल गायकवाड वय वर्ष 28 रा. पिंपरी चिंचवड पुणे ,दीपक सुधाकर सुपे वय वर्ष 48 रा. बोदवड, अमर रमेश पिंजरकर वय वर्ष 45 रा. मलकापूर, रत्नदीप माधवराव पाटील वय वर्ष 45 पिंपरी चिंचवड पुणे, मनोज सुधाकरराव मुधोळकर वय वर्ष 50 रा. मलकापूर ,रमा निलेश आखाडे वय वर्ष 25 रा. निगडी पुणे, कोमल रमेश गायकवाड वय वर्ष 27 अजिंठा नगर पिंपरी चिंचवड पुणे इत्यादी आरोपी असून यांच्याकडून जादूटोण्यात वापरणाऱ्यांना विविध वस्तू लिंबू मिरची हळकुंड जप्त करण्यात आले असून त्यामध्ये एक लाल रंगाची मारुती सुझुकी कार MH 14 HD 4798 ही जप्त करण्यात आली असून ,४४१४८० रुपयाचा मुद्देमाल व पूजेचे साहित्य बोराखेडी पोलिसांनी जप्त केले असून १३२/२५२५ कलम महाराष्ट्र्र नळ बळी व इतर अमानुष समाविष्ट व अघोरी प्रथा व जादू टोणा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बोराखेळी पोलिस करत आहे