मोताळा तालुक्यातील कांग्रेस हजारॊ कार्यकत्याचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश ..

159

[ मोताळा लाईव्ह ] दिनांक : २२ मार्च २०२५ रोजी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या जन्मस्थळी थड येथे काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सौ. नीताताई पाटील यांच्यासह विविध गावांचे सरपंच, माजी सरपंच, ग्राम सोसायटी सदस्य, विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेना पक्षात आमदार संजय गायकवाड यांच्य्या नेतुत्वात प्रवेश केला.या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना नेते विजुभाऊ अंभोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, सुभाषसिंग राजपूत, गणेशसिंगभाऊ राजपूत, विजयसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, मा.नगराध्यक्ष श्री विठ्ठलराव येवले,निलेश गुजर, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, प्रवीण जाधव, प्राध्यापक श्री गणेश बस्सी,शहरप्रमुख गजेंद्र दांदडे यांसह असंख्य शिवसेना,युवासेना,महिला आघाडी,किसान सेना, अल्पसंख्यांक सेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते….!