बालमनात रुजवल्या गेलेले संस्कार आयुष्यभराची शिदोरी असते. रुजवल्या गेलेल्या संस्काराचे संगोपन केल्यास सशक्त सुदृढ समाजाची देशाची निर्मिती होणारच या दुमत नाही. करिता सशक्त सुदृढ युवा निर्मितीसाठी संस्कार शिबिर काळाची गरज आहे. असे मत वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सहस्त्रमुळी येथे एक मे ते वीस मे दरम्यान आयोजित शिबिराचा 20 मे ला श्री मुंगसाजी महाराज संस्थान परिसरात वारकरी सांप्रदायिक बाल संस्कार शिबिराचा थाटात समारोप करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना हभप शास्त्री महाराजांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
_
गीता पठाण, संस्कृत श्लोक, गायन,मृदंग, हरिपाठ, काकडा, टाळ, पावल्या, किर्तन, प्रवचन, अभंग, योगासने, महापुरुषांचे चरित्र, मुक्ताई अष्टक आदी विषयांमध्ये बालसंस्कार शिबिरातील सर्वोत्कृष्ट तीन विद्यार्थी अशा एकूण 60 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य म्हणून प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
_
शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख उपस्थिती.
कैवल्यमूर्ती हभप वासुदेव महाराज शास्त्री, हभप संदीप महाराज हिवाळे,काटी ,प्रबोधनकार सतीशचंद्र रोठे पाटील, हभप शत्रुघ्न महाराज उन्हाळे, हभप रामेश्वर महाराज बिचारे, हभप भास्कर महाराज मालठाने, हभप मणिक महाराज,हभप समाधान महाराज शिंगोटे मुंबई, हभप गजानन महाराज म्हैसागर पी.खुटा.आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या भेटी आशीर्वाद.
हभप तुकाराम महाराज एलोरा, हभप संजयजी महाराज पाचपोर, हभप रविंद्र महाराज हरणे मुक्ताईनगर, हभप महादेव महाराज खंडागळे निपाणा, हभप राम भारती महाराज चांगेफळ,
हभप रामभाऊ महाराज झांबरे नांदुरा,मुरलीधर महाराज वाघ राहुड,हभप शिवदास महाराज राहणे पानेरा, हभप समाधान महाराज शिंगोटे मुंबई, गणेश महाराज दादगाव आदींनी भेटी देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, आशीर्वाद दिले.
__
शिबिरा दरम्यान दैनंदिन चहा, नाश्ता व सकाळ संध्याकाळची अन्नदान सेवा पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सरपंच, लोकप्रतिनिधी, वारकरी,धार्मिक सांप्रदायिक धर्मसेवकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.
_
यशस्वीतेसाठी पंचक्रोशीतील राजेंद्र माहोरे,वामन मोहरे, राजू माहोरे, योगेश माहोरे, मारुती माहोरे,महादेव वराडे, सारंगधर माहोरे, शिवाजी माहोरे,संतोष माहोरे,विठ्ठल माहोरे,पुंडलिक सरोदे, सतीश माहोरे,शंकर माहोरे,विजय माहोरे, पंकज माहोरे ,गणेश वराडे, कमलाकर माहोरे, निलेश वराडे, गजानन माहोरे,रामा माहोरे यांच्यासह श्री मुंगसाजी महाराज संस्थान सहस्त्रमुली पदाधिकारी विश्वस्तांनी वीस दिवस अथक परिश्रम घेतले.
__