[मोताळा लाईव्ह ] मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जयहिंद लोकचळवळचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी शिक्षण संस्था द्वारा संचलित कृष्ठधाम चावर्दा ता मोताळा येथे अमर कुळे समन्वयक जयहिंद लोकचळवळ व सहकाऱ्यांच्या वतीने कृष्टरोग्यांना फळवाटप करण्यात आले, चावर्दा येथील कृष्ठधाम सन १९८१ पासून कृष्ठरोग्यांची अविरत सेवा करत आहे, उपस्थित सर्व कृष्ठरोग्यांनी आमदार श्री मनोजभाऊ कायंदे यांना उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिला, या कार्यक्रमाच्या वेळी श्री सुनिल पाटील मा. सरपंच चावर्दा, अमर गवई, ऋतिक वैराळकर, सागर महाजन यांची उपस्थिती होती..
Home महाराष्ट्र अपडेट आमदार मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जयहिंद लोकचळवळच्या वतीने फळवाटप कार्यक्रम…