[ मोताळा लाईव्ह ] मोताळा तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी कमीशन देणाऱ्याकडून निविदा घेवून गणवेश प्रकीया पूर्ण केली. गणवेश निविदा प्रक्रीया नियमानुसार पार न पाडता मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी तरोडा येथील सरपंच, सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शेकडो ग्रामस्थांच्यावतीने गटविकास अधिकाऱ्यांना 2 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
तरोडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी गणवेश खरेदीच्या निविदा प्रसिध्द केली नाही. दुसरा गणवेश खरेदीसाठी गावात दवंडी न देता आपल्या मर्जीतील दुकानदाराकडून निविदा मागवून नियमानुसार निविदा मागणीसाठी वेळ न देता फक्त तीन दिवसाचा वेळ देवून कमीशन देणाऱ्याकडून निविदा घेवून गणवेश प्रक्रीया पूर्ण करण्यात आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गणवेश प्रक्रीया पारदर्शीपणे राबविण्यात आली नाही. गावात दवंडी दिल्याची सरपंच यांची प्रत्यक्ष स्वाक्षरी घेवून दवंडी दिली नाही. सदर गंभीर प्रकरणाची चौकशी करुन मुख्याध्यापक यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. गणवेश खरेदी प्रक्रीया पूर्ण नियमानुसार व पारदर्शीपणे घेण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर सरपंच सौ.खांडेभराड, ग्रा.पं.सदस्य संजय शेळके, जयसिंग जाधव, शुभम किनगे, ग्रा.पं.सदस्य एकनाथ जाधव, मुकेश येरवाळ, प्रतिभा येरवाळ, शाळा व्यवस्थापन सदस्य सुनिल मंझा, जिवनसिंग येरवाळ यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.