राजपूत समाज दर्पण चे वेब पोर्टल समाज बांधवांच्या सेवेत रुजू

509

राजपूत समाज दर्पण चे वेबपोर्टल राजपूत समाज बांधवांच्या सेवेत रुजू

खामगाव-  राजपूत समाज दर्पण मासिक च्या माध्यमातून आम्ही 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी च्या पावन पर्वावर समाजातील घटना, घडामोडी सर्व समाज बांधवांना माहिती होऊन जागरूकता व्हावी या उद्देशाने सुरू केले, परंतु मासिकाच्या माध्यमातून रोजच्या होणाऱ्या घडामोडी, समाजाचे उपक्रम, विविध आंदोलने यांची माहिती समाजबांधवापर्यंत पोहचविण्यास एक महिन्याच्या कालावधी उलटून जात होता, या वेबपोर्टलच्या माध्यमातून आता 24 तास बातम्या, घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्यास आम्ही कटीबद्द आहोत,

राजपूत समाज कार्यकर्त्यांचे काम सर्वदूर पोहचविणे हा उद्देश

राजपूत समाजातील कार्यकर्ते विविध आंदोलनातून समाजाच्या समस्या शासनदरबारी मांडत असतात, भोगोलिक दृष्ट्या राजपूत समाज महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेला आहे, मात्र कार्यकर्त्यांचे केलेले काम सर्वच जिल्ह्यात पोहचत नव्हते, या वेबपोर्टल च्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या सकारत्मक घडामोडी सर्वदूर पोहचविण्याचा आमचा उद्देश आहे, याशिवाय इतरही राजकीय, सामाजिक, राष्ट्रीय घडामोडीची माहिती आपल्याला वेबपोर्टल वर मिळेल,