25 ऑक्टोबरला मोताळा राज्यस्तरीय वारकरी धर्म परिषदेचे भव्य आयोजन.

17

मोताळा :राष्ट्रसंत आणि वारकऱ्यांच्या सन्मानार्थ धर्म संस्काराची अस्मिता तेवत ठेवणे. लोकउपयोगी सामाजिक उपक्रम आणि प्रबोधनातून वारकऱ्यांच्या संरक्षणार्थ कायदा निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय वारकरी धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती 22 ऑक्टोबरला आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री यांनी दिली आहे.25 ऑक्टोंबर शुक्रवारल वाघजाळ आश्रम,मोताळा येथे एक दिवसीय राज्यस्तरीय वारकरी धर्म परिषदेच्या आयोजनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत परिषदेचे मुख्य संयोजक हभप शास्त्री महाराज यांनी उपरोक्त माहिती देत मत व्यक्त केले. ज्ञानोबा तुकोंबासह, राष्ट्रसंतांबद्दल अवमानकारक विधान करण्यांवर बंदी घालावी, तसा कायदा तयार करावा. राष्ट्रसंत तुकोबांबद्दल अवामान कारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी.नारदाच्या गादीवर बूट घालून येणे,कीर्तनात व्यत्यय निर्माण करणे, हरिभक्त पारायण वारकऱ्यांना शिवीगाळ करणे,अशा समाज विघातक प्रवृत्तींना प्रतिबंध लावणे, करीता किर्तन, पंढरीची वारी, आणि वारकऱ्यांच्या संरक्षणार्थ कायदा निर्माण करणे. यासह वारकऱ्यांच्या धर्म,संस्कार आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत चालणाऱ्या वारकरी धर्म परिषदेमध्ये गोसेवक रामायणाचार्य वारकरी भूषण हभप संजय महाराज पाचपोर यांचा सत्कार, प्रबोधन, व्याख्यान, वारकरी भजन गायन स्पर्धा,मोफत औषधोउपचार शिबिर, उत्कृष्ट कार्या करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा सन्मान, गरजूंना मदत, यासह लोकउपयोगी,सामाजिक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन वारकरी परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अशी माहिती वारकरी धर्म परिषदेचे संयोजक प्रबोधनकार अँड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी वारकरी धर्म परिषद संयोजन समिती तथा सत्कार समितीचे सर्वश्री सदस्य संजय ऐंडोले, सुरेखाताई निकाळजे, पंचफुला गवई, सिंधुताई अहेर, आशाताई गायकवाड, निर्मलाताई रोठे, विमलताई मोरे, प्रल्हाद राऊत, मारुती देशमुख शंकर शिंबरे पाटील, तेजराव पाटील, गुना पाटील, विनायक पाटील, विठ्ठल पाटील, देविदास गावणकर, गजानन ठाकरे, निवृत्ती राऊत, भगवान राऊत, कैलास शिंबरे, बंडू पाटील, नारायण देशमुख, युवराज राऊत, प्रसाद काकर, सौरभ थोरगन, मोहन महाराज गारमोडे, गोपीचंद रबडे, गोविंदा शिंबरे, शिवाजी शिंबरे, आदित्य गवई यांच्यासह संयोजन समितीचे बहुसंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.