मोताळा: राज्यस्तरीय वारकरी धर्म परिषदेसाठी राष्ट्रसंत तुकाराम संतनगरी (वाघजाळ आश्रम) सज्ज झाली आहे. सत्कार सोहळा, प्रबोधन, आरोग्य शिबिर, भजन स्पर्धा, यासह विविध लोकउपयोगी उपक्रमांनी आज राज्यस्तरीय वारकरी धर्म परिषद संपन्न होणार आहे.
24 ऑक्टोंबरला सायंकाळी वाघजळ आश्रम या ठिकाणी नियोजन आयोजन बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत वारकरी परिषद व सत्कार समारंभाच्या अनुषंगाने विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील विचारवंत,त्यागमूर्ती, वारकरी भूषण महाराजांचे प्रबोधन, उदबोधनातून वारकऱ्यांच्या समस्या,व्यथा, वेदनेवर फुंकर घालून वारकरी संरक्षण कायदा निर्माण करण्यासाठी ठराव पारित केल्या जाणार आहे.
यासह प्रबोधन,आरोग्य शिबिर, महाप्रसाद, भजन स्पर्धा, ह भ प संजय महाराज पाचपोर सत्कार, कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांनी राज्यस्तरीय परिषद संपन्न होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी राज्यस्तरीय वारकरी धर्म परिषद जिल्ह्यात होणे अभिमानाची बाब आहे यासाठी जिल्ह्यातील वारकऱ्यांनी बहुसंख्येने वारकरी धर्म परिषदेत सहभागी व्हावे. असे आवाहन वारकरी धर्म परिषदेचे मुख्य संयोजक वारकरी भूषण हभप वासुदेव महाराज शास्त्री, संयोजक ॲड सतीशचंद्र रोठे पाटील, नितीन तापडिया, संजय एंडोले, नितीन जयस्वाल, सुरेखाताई निकाळजे, निर्मलाताई रोठे,शंकर पाटील, तेजराव पाटील, पुजारी कडूबा पाटील, प्रल्हाद राऊत पाटील, मारुती देशमुख, विठ्ठल पाटील, महादेव सपकाळ, सौरभ थोरगन, प्रशांत काकर, शिवा शिंबरे पाटील, पिंटू पाटील, युवराज पाटील, गोविंदा शिंबरे, योगेश कोकाटे आदींनी केले आहे.