( मोताळा लाईव्ह ) बोराखेडी पोलिसांनी बोराखेडी शिवारातील नळगंगा नदीपात्र तसेच तरोडा येथे धाड टाकली. या धाडीत गावठी दारुसह मोहसडवा असा एवूâण ७५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी चार जणांवर बोराखेडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
बोराखेडी पोलिसांनी गावठी दारुविरोधात अॅक्शन मोडवर येत बोराखेडी शिवारातील नळगंगा नदीपात्रात आज गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० गावठी दारु पाडणे तसेच दारु विक्री करणाNया चौघांवर कारवाई केली. पोलिसांनी विक्की विश्वनाथ गायकवाड, भिलवाडा बोराखेडी याच्या ताब्यातून १० लिटर हातभट्टी विेंâमत १०५० रुपये, १६ प्लास्टीक वॅâनमधील २४० लिटर मोहसडवा २१ हजार ६०० रुपये, ३५५० रुपयांचे साहित्य असा एवूâण २६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसNया कारवाईत गावठी हातभट्टी चालविणाNया सुनिल श्यामराव मोरे भिलवाडा, बोराखेडी येथे धाड टावूâन त्याच्याकडून १२ हजार ४५० रुपयांची गावठी दारु व मोहसडवा जप्त केला. तिसNया कारवाईत कमलबाई देविदास गायकवाड भिलवाडा, बोराखेडी या महिलेच्या ताब्यातून गावठी दारु, मोहसडवा असा २४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर तालुक्यातील तरोडा येथे टाकलेल्या चौथ्या धाडीत उमेश ईश्वर इरवळ याच्या ताब्यातून गावठी दारु व मोहसडवा १२ हजार ७५० रुपये चौघांकडून गावठी दारुसह मोहसडवा असा एवूâण ७५ हजार ९५० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. पोहेकाँ. नंदकिशोर धांडे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी विक्की गायकवाड, सुनिल मोरे, उमेश येरवळ व कमलबाई गायकवाड यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६५ (क),(फ),(ड) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.