दोन मोटरसायकल भिडल्या : एक ठार तर एक जखमी पुन्हई फाट्यावरची घटना

101

(मोताळा लाईव्ह ) मोताळा तालुक्यातील मोताळा ते वडगाव रस्तावर पुन्हई फाट्यावर दोन मोटरसायकल अमोरासमोर धडकल्या, या अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला या अपघातात .प्रभाकर दिगंबर जवरे (वय अंदाजे 55 वर्षे ) हे मयत झाले असून दुसऱ्या मोटार सायकलवर स्वार सचिन खंडागळे (रा. डिडोळा)  जखमी असून त्याला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे..