बोराखेडी वडगाव रस्त्यावर आठ महिन्यात आठ बळी. फांद्यांची कटाई करून अनोखे आंदोलन. अपघाग्रस्त रस्त्यांची 48 तासात उपायोजना करावी..

19

(मोताळा लाईव्ह ) तालुक्यातील बोराखेडी वडगाव दरम्यान पून्हई अंत्री दरम्यानचे टर्निंग पॉईंट जीवघेणे पॉईंट ठरत आहे. वळणावरील झाडांमुळे समोरील रस्ता दिसत नाही. रस्त्याच्या कडेला फुटपाथ पट्टे नाही,अपघात प्रवणस्थळ बोर्ड नाही, वळणावरील रस्ता खालीवर आहे. त्यामुळे या रस्त्यावर मागील आठ महिन्यात आठ जणांचा बळी गेला आहे. तर कालच दोन टू व्हीलर ची आमोरासमोर धडक झाल्याने प्रभाकर जवरे पाटील यांचा दुर्दैवी अंत तर डिडोळा येथील सचीन खंडागळे गंभीर जखमी आहेत.बोराखेडी ते आव्हा लिहा, पोखरी पर्यंतच्या संपूर्ण रस्त्यांची एक महिना पूर्वी पाहणी करीत तक्रार आझाद हिंदचे सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केली होती. तर नुकत्याच झालेल्या दुर्देवी अपघाताची दखल घेत अपघातग्रस्त ठिकाणी जाऊन रस्त्याची पाहणी केली. संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून अपघाता मागची कारणे विशद केली. त्वरित सांगितलेल्या मागण्यांची पूर्तता करावी.अन्यथा निवडणूक उमेदवार आणि आचारसंहिता विसरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे. तर महत्त्वाच्या वळणावरील झाडांच्या फांद्या आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांसह स्वतः तोडून अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन सुद्धा केला आहे.