सारोळा मारोती येथील जिल्हा परिषद शाळाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला

17

( मोताळा लाईव्ह ) सारोळा मारोती मराठी पुर्व माध्यमिक शाळेचे बाह्य स्वरूप तसेच विद्यार्थी चे शैक्षणिक स्वरूपात अमुलाग्र बदल करून आपल्या शाळेला तालुका स्तरावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या सत्काराचा कार्यक्रम सारोळा मारोती जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सभापती आदरणीय शरदचंद्र पाटील यांची उपस्थिती लाभली
तसेच प्रमुख पाहूणे म्हणून माजी सरपंच शिवाजीराव पाटील,पोलीस पाटील भरत दादा ढकचवळे, ग्रामपंचायत सदस्य भगवान जाधव,अशोक रत्नपारखी गुरुजी,सरपंच सुखदेवराव शिपलकर,गजानन कुऱ्हाडे,बाळासाहेब कुऱ्हाडे,रघुनाथ भाऊ जाधव,संजूभाऊ मानमोडे,माजी सरपंच राजूभाऊ झुंजारके,गोपाळ भाऊ शिपलकर, भागवत जाधव,ईश्वर भाऊ कातोरे आदी गावकरी मंडळी उपस्थित राहून सर्व शिक्षक वृद यांचा सत्कार करून अभिनंदन केले