सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय दया ! उद्या मोताळा येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

43

( मोताळा लाईव्ह ) विविध मागण्यांसाठी उद्या मोताळा येथे शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या लोकांनी यांच्या वतीने 24 /12 /24 ला मंगळवार या दिवशी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. विविध मागण्यांसाठी उद्या संविधान प्रेमींनी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून हा मोर्चा आठवळी बाजारापासून तहसील कार्यालय मोताळा पर्यत निघणार असून त्यामध्ये परभणी मधील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी योग्य ती कारवाई करून मयत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकार कडून आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी, संविधानाच्या विरोधी बोलणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा कायदा करण्यात यावा अशा मागण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे