मोताळा नांदुरा रस्तावर अपघात स्कुल बसला कारची धडक .एक ठार

496

( मोताळा लाईव्ह ) मोताळा ते नांदुरा रस्त्यावरतीअसलेल्या 132 केव्ही उपकेंद्रासमोर असलेल्या स्कूल बसला कारणे जबर धडक दिली असून यामध्ये एक 32 वर्षे युवक ठार झाला असून सदर युवक हा जळगाव जामोद येथील आहे

मोताळा ते नांदुरा रस्त्यावरती दिनांक 22 डिसेंबरच्या मध्यरात्री मोताळा येथील असलेल्या 132 kv च्या उपकेंद्रासमोर एम एच 28 बी 83 74 ही स्कूल बस एका कार्यक्रमावरून जळगाव जामोद कडे जात होती सदर ही स्कूलबस गरम झालेल्या त्यामध्ये पाणी टाकण्यासाठी ही गाडी रस्त्याच्या कडेला थांबली होती त्यादरम्यान या उभ्या असलेल्या स्कूल मधून मो मुसब अब्दुल जाबीर वय वर्ष 32 राहणार जळगाव जामोद हे गाडीखाली उतरून पाणी टाकत असताना नांदूरा या कडून येणाऱ्या भरदार कारणे एम एच ०३ सीएम 14 71 च्या कार स्कूल बसला जोरदार या धडकेत मो. मुसब अब्दुल जाबीर हे जागीच ठार झाले ,स्कूल बस मधील इतरांना सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही या अपघाताबाबत बोराखेडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे….