(मोताळा लाईव्ह ) बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम वाघजाळ येथे दिनांक २३/१२/२०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचा नागरिक सत्कार करण्यात आला व त्यांची लाडूतुला सुद्धा करण्यात आली विधानसभा निवडणुका होऊन जवळपास एक महिना उलटला असून 23 नोव्हेंबरला या ठिकाणी निवडणुकीचे निकाल लागले होते जवळपास एका महिन्यानंतर आज प्रथमच आमदार संजय गायकवाड यांचा मोताळा तालुक्यातील असलेले वाघजाळ येथे नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला असून संपूर्ण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांचा नागरी सत्कार केला यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी प्रथमच या ठिकाणी नागरी सत्कार स्वीकारला असून बोलत असताना या ठिकाणी भावुक झाले होते मोताळा तालुक्यात असलेल्या वाघजाळ येथील तेजराव पाटील हे आमदार संजय गायकवाड यांचे एकनिष्ठ असलेले कार्यकर्ता म्हणून तेजराव पाटील यांची ओळख आहे या गावांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संजय गायकवाड यांना चांगला लीड दिल्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी नागरिकांचे आभार सुद्धा या ठिकाणी मानले या कार्यक्रमाला गावातील महिला मोट्या प्रमाणात उपस्तित होत्या