जळकुट्याने ७ टन गवत पेटवून दिले ८० हजाराचे नुकसान… सिंदखेड येथील घटना

199

(मोताळा लाईव्ह) मोताळा तालुक्यातील असले सिंदखेड हे गाव एक आदर्श गाव असून या गावाला राज्यस्तवावर पाणी फाउंडेशन तसेच अनेक पुरस्कार सुद्धा या गावाला प्राप्त झाले आहे या गावांमध्ये राज्यातील सर्वात मोठा मिया वाकी प्रकल्प सुद्धा असून याच प्रकल्पासाठी कर्तव्यदक्ष सरपंच प्रवीण कदम यांनी भंडारा येथून प्रकल्पामध्ये आच्छादनासाठी ७ टन गवत हे आणले होते आज दिनांक १/०१/२०२५ रोजी संघ्याकाळी ५ वाजेच्या सुमारास एका जळकुट्याने गवत पेटवून दिले असून ,त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामध्ये जवळ पास ८० हजाराचे नुकसान झाले असून त्यावर ती कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी आता होत आहे