(मोताळा लाईव्ह ) आंबेडकरवादी एकता मंच तालुका मोताळा यांच्या वतीने मोताळा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाची प्रतिकृतीस मानवंदना देऊन शहीद शूरवीरांना अभिवादन करण्यात आले.
मोताळा फाटा येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ उभारण्यात आला होता . सेवानिवृत्त सैनिक अनिल तेलंग, भावराव धंदरे, राजेश डोंगरे, अशोक सरकटे व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक शिंदे गणेशसिंग राजपूत व तुळशीराम नाईक यांनी विजयस्तंभाची प्रतिकृतीला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शाहीर श्रीकृष्ण सुरडकर, विलास इंगळे, सुदर्शन अहिरे यांनी भीमगीत गायनाने सुरुवात केली.उभारलेली विजयस्तंभाची प्रतिकृती व प्रतिकृतीस मानवंदना देण्यासाठी उपस्थित मान्यवर व समाजबांधव. साहित्यिक प्रा. सुरेश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा पार पडली. दरम्यान, सतीश गुरचवळे, शेषराव गायकवाड, विशाखा साहेबराव डोंगरे, लक्ष्मणराव गवई, निळकंठ वानखेडे, भीमराव सिरसाट, साहेबराव डोंगरे, डी. टी. इंगळे, ऍड. सतीशचंद्र रोठे, वासुदेव महाराज शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. प्रा. साबळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भीमा कोरेगाव युद्धाची पार्श्वभूमी व वास्तव विशद केले. सूत्रसंचालन एस.पी. अहिरे, प्रास्ताविक विनोद सावळे तर, आभार प्रदर्शन संतोष खराटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहेबराव डोंगरे, निळकंठ वानखेडे, गजानन अहिरे, लक्ष्मणराव गवई, सतीश नरवाडे, एस.पी.अहिरे, शेषराव गायकवाड, संदीप वानखेडे, अमोल तेलंग, सचिन हिरोळे, भीमराव सिरसाट, किरण खराटे, प्रेम धुरंधर, राहुल तेलंग, भावजी कोलते, पद्माकर सरकाटे, एकनाथ तायडे, किसन इंगळे, गौतम सरकाटे, विनोद सावळे, बाळासाहेब अहिरे, संदीप मोरे,
एम. बी. मेढे, मनोहर जाधव, डिगंबर जाधव, भास्कर सावळे, रवी रायपुरे, बळीराम नरवाडे, सोपान सावळे, राजेंद्र सावळे, निंबाजी गायकवाड, अजाबराव अहिरे, सुजित सिरसाट, ज्ञानेश्वर खराटे, रवी सावळे, रतन गवई, अमोल इंगळे, अनिल दाभाडे, सुनील तेलंग, निलेश वानखेडे, रमेश मोरे यावेळी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…