( मोताळा लाईव्ह ) सहकार विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा,सृजनशील,नवोपक्रम शिलतेचा विकास व्हावा या करिता.दिनांक ७ जानेवारी व ८ जानेवारी रोजी बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचलित सहकार विद्या मंदिर मोताळा येथे संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय डॉक्टर सुकेशजी झंवर सर यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सप्तरंग २०२४-२५ उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी पालकांचे तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय डॉक्टर सुकेशजी झंवर सर यांनी संस्थेच्या बाबत बोलताना आदरणीय भाईजी यांनी बुलढाणा अर्बनच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत जो वटवृक्ष झाला त्याबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले तसेच बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा आदरणीय सौ. कोमलताई झंवर यांनी शाळेसाठी केलेले अनमोल असे कार्य व्यक्त केले तसेच सहकार विद्या मंदिराच्या माध्यमातून जवळजवळ २५००० विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहे व सहकार विद्या मंदिराच्या बुलढाणा, जळगाव, अकोला व नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण २३ शाळा आहेत तसेच भविष्यामध्ये वेदविद्यालय गुरुकुल पद्धत ही आपल्या बुलढाणा अर्बन द्वारे आपण राबवू तसेच भगवत गीता मानवी जीवनाचा आधार आहे.. वेद,उपनिषद प्राचीन जीवनशैली यांचे अनुकरण करणे काळाची गरज आहे असे पालकांना व विद्यार्थ्यांना संबोधित केलं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हेमंत पाटील (तहसीलदार मोताळा ),श्री. सारंग नवलकर (बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार), श्री मनोहर धंधर , (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोताळा)श्री. भिकमचंदजी झंवर (स्थानिक संचालक बुलढाणा अर्बन) , डॉक्टर सौ.छाया महाजन, डॉक्टर सौ. तेजल काळे, सौ सुनीता शिंदे (केंद्रप्रमुख), आनंद चांडक (विभागीय व्यवस्थापक मलकापूर विभाग), श्रीकृष्ण पाटील (शाखा व्यवस्थापक मोताळा),सतीश पाटील, डॉक्टर रवींद्र बांगर, सचिन राजपूत (मुख्याध्यापक svm धाड),अभिजित देशमुख (मुख्याध्यापक सहकार विद्या मंदिर मोताळा) पत्रकार बंधूंमध्ये शिवाजी मामलकर, विष्णु शिराळ, पप्पू राठी, गणेश पाटील, गोपाल काटे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीवर आधारित नृत्य सादर केले, शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने उपस्थीतांची मने जिंकली. विविध राज्यांच्या संस्कृतीला प्रदर्शित करणारे नृत्य प्रेक्षकांना आनंदून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अभिजित देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन विकास पाटील, सृष्टी कोल्हे, वेदांती पाटील, प्राची खर्चे, मंजिरी घिवे , महिमा पठाडे,भावना झोलाणे, प्रतीक्षा येवतकर, मानसी इंगळे, अदिती पवार, रेणुका चव्हाण, संजना मगरे, प्रांजली कटोले, सोहम खर्चे, मोहित किनगे, यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू वखरे यांनी केले.