अवैध्य रित्या मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मोताळ्यात कारवाई… माती वाहतूकी चा परवाना नसतानाही होते वाहतूक… तहसीलदार हेमंत पाटील ॲक्शन मोडवर….

109

( मोताळा लाईव्ह )बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात आज तहसीलदार हेमंत पाटील यांनी केली मोठी कारवाई, मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील हे ॲक्शन मोड वरती दिसून येत आहेत..मातीने गच्च भरलेले 10 चक्का टिप्पर क्रमांक MH 28BB 7663  पकडले, या टिपर मध्ये सिगोसाठ माती भरल्याने रस्त्याने माती चालताना सुद्धा ती माती खाली पडत होती एवढेच काय ही माती पाठीमागे चालणाऱ्या वाहनचालकाच्या डोळ्यांमध्ये सुद्धा या मातीचे कण जात होते, याबाबत हेमंत पाटील यांनी या ट्रिपला पकडले असून तहसील कार्यालयात जमा केले आहे याबाबत आता प्रादेशिक परिवहन बुलढाणा यांना याबाबतची माहिती देणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे…..तर मोताळा तालुक्यात मोठ्या अवैध उत्तखन होत असून त्यासाठी मोताळा तहसील हेमंत पाटील हे त्यांना लगाम लावणार अशा सुद्धा प्रश पडत आहे