(मोताळा लाईव्ह ): हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिनांक 23 जानेवारी रोजी त्यांना अभिवादन करून शिवसेना सदस्यता मोहीम नोंदणीला मोताळा शहरामध्ये सुरुवात करण्यात आली . संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती पासून महिनाभर शिवसेना सदस्यता मोहीम नोंदणी अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत, या पार्श्वभूमीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सदस्यता मोहीम संपूर्ण तालुक्यामध्ये राबविला जाणार असून मोताळा शहरांमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शिवसेना सदस्यता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांच्या मेळावे घेऊन, घरोघरी भेटी देऊन हे अभियान अधिक व्यापक पणे राबवले जाईल. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शहराध्यक्ष सुरेश खर्चे, तालुका कार्याध्यक्ष गणेश पाटील, युवा सेना तालुका अध्यक्ष मारुती कोल्हे, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर वाघ, गटनेते प्रदीप जैन, मोताळा तालुका प्रसिद्धीप्रमुख गणेश झंवर, नगरसेवक सचिन हिरोळे, सचिन घडेकर आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते….