[मोताळा लाईव्ह ] बिहार राज्यात असलेले “महाबोधी बुध्दविहार बुद्धगया” हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील बुध्दानुयायांचे बौध्दांचे सर्वाधिक पवित्र श्रध्दा स्थान आहे. “महाबोधी बुद्धविहार बुद्धगया” बौद्धांचे श्रद्धा स्थान असून तिथे हिंदू पुजा-यांच्या ताब्यात आहे. कोणत्याही धर्माचे श्रध्दा स्थान, पूजास्थान ईतर धर्मियांच्या ताब्यत असलेले हे जगातील एकमेव उदारण बौध्द संस्कृती व हिंदू संस्कृती परस्पर विसंगत आहेत. “महाबोधी बुध्दविहार बुद्धगया” बौध्दांच्या ऐवजी ईतर धर्मियांच्या ताब्यात असल्यास त्यात हळूहळू सरभेसळ करून बौध्द संस्कृतीच्या भगवान बुध्दाच्या खाणाखुणा नष्ट केल्या
जाण्यची भीती अधिक आहे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी बौध्दांचे श्रद्धास्थान असलेले “महाबोधी बुध्दविहार बुद्धगया” बौध्दाच्या ताब्यात मिळावे ही मागणी अनेक वर्षापासून बुध्द अनुयायाकडून केल्या जात आहे परंतु भारत सरकारकडून मात्र बौध्दांच्या च्या या मागणीची प्रतारणा केली जात आहे.
करिता आम्ही सेवेशी विनम्र निवेदन सादर करतो की, महाबोधी बुध्दविहार बुद्धगया विनाविलंब बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे.व त्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात यावे यासाठी मोताळा तहसीलमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले त्यावेळीविजय दोडे सतीश नरवाडे गजानन अहिरे राजूभाऊ गायकवाड राजेंद्र सावळे अजाबराव अहिरे अमोल तेलंग संदीप धुरंदर मंगेश सुरडकर शिवाजी तायडे पद्माकर सरकटे रोहन महाले हुसेन खा मोहम्मद खा आदी उपस्थित होते